ज्ञान्यांचा वध करावा हा हुकूम सुटला, तेव्हा दानिएलाचा व त्याच्या सोबत्यांचा वध करावा म्हणून लोक त्यांना शोधू लागले. राजाच्या गारद्यांचा नायक अर्योक हा बाबेलच्या ज्ञान्यांचा वध करण्यास निघाला होता, त्यांच्याबरोबर दानिएलाने चातुर्याने व सुज्ञतेचे भाषण केले. त्याने राजाचा सरदार अर्योक ह्याला म्हटले, “अशी निकडीची राजाज्ञा का?” तेव्हा अर्योकाने दानिएलास ती हकीगत सांगितली. मग दानिएलाने राजाकडे जाऊन विनंती केली की, “मला अवकाश द्यावा म्हणजे मी हुजुरास स्वप्नाचा अर्थ सांगेन.” ह्यावर दानिएलाने आपल्या घरी जाऊन आपले सोबती हनन्या, मीशाएल व अजर्या ह्यांना ही हकीगत कळवली. आणि बाबेलच्या इतर ज्ञान्यांबरोबर आपला व आपल्या सोबत्यांचा घात होऊ नये म्हणून दानिएलाने त्यांना विनंती केली की, ह्या रहस्यासंबंधाने स्वर्गीय देवाने आपणांवर दया करावी असे त्याच्याजवळ मागावे. मग रात्री दृष्टान्तात हे रहस्य दानिएलास प्रकट झाले; त्यावरून दानिएलाने स्वर्गीय देवाचा धन्यवाद केला.
दानीएल 2 वाचा
ऐका दानीएल 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: दानीएल 2:13-19
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ