तर मग खाण्यापिण्याविषयी, तसेच सण, अमावस्या किंवा शब्बाथ पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका. ह्या बाबी पुढे होणार्या गोष्टींच्या छाया आहेत; शरीर तर ख्रिस्ताचे आहे. लीन म्हणवून घेण्याच्या इच्छेने देवदूतांची उपासना करणार्या, स्वत:ला न दिसलेल्या गोष्टींवर अवलंबून राहणार्या व दैहिक बुद्धीने उगीचच गर्वाने फुगणार्या कोणा माणसाला तुम्हांला फसवून तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका. असा माणूस मस्तकाला धरून राहत नाही; त्या मस्तकापासून सर्व शरीराला सांधे व बंधने ह्यांच्या योगे पुरवठा होत आहे व ते दृढ जडले जात असता त्याची ईश्वरी वृद्धी होते.
कलस्सै 2 वाचा
ऐका कलस्सै 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: कलस्सै 2:16-19
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ