“शोमरोन डोंगरावर असणार्या बाशानाच्या गाईंनो, ज्या तुम्ही दीनांना नाडता, गरिबांना ठेचता व आपल्या धन्यांना म्हणता, ‘आणा, आम्हांला पिऊ द्या!’ त्या तुम्ही हे वचन ऐका : प्रभू परमेश्वराने आपल्या पवित्रतेची शपथ वाहून म्हटले, “पाहा, असे दिवस तुम्हांला येत आहेत की तुम्हांला आकड्यांनी ओढून नेतील; शिल्लक राहिलेल्यांना मासे धरण्याच्या गळांनी ओढून नेतील. एकीपुढे एक अशा तुम्ही तटाच्या भगदाडांतून नीट बाहेर चालत्या व्हाल व हर्मोनात जाऊन पडाल,” असे परमेश्वर म्हणतो. “बेथेलास जाऊन पातक करा, गिल्गालास जाऊन पातकाची वृद्धी करा; प्रतिदिवशी सकाळी आपले यज्ञ अर्पा, दर तीन दिवसांनी आपले दशमांश आणा; खमीर घातलेल्या भाकरींची अर्पणे ईशोपकारस्मरणासाठी होमरूपे अर्पा. स्वसंतोषाने केलेल्या अर्पणांचा पुकारा करा, ती सर्वांना ऐकवा; इस्राएलवंशजहो, तुम्हांला हे आवडते, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
आमोस 4 वाचा
ऐका आमोस 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: आमोस 4:1-5
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ