YouVersion लोगो
सर्च आयकॉन

आमोस 2:1-8

आमोस 2:1-8 MARVBSI

परमेश्वर म्हणतो, “मवाबाचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण त्याने अदोमाच्या राजाची हाडे भाजून त्यांचा चुना केला. त्यामुळे मी मवाबावर अग्नी पाठवीन, तो करियोथाचे महाल जाळून भस्म करील व त्या दंगलीत रणशब्द व शिंगाचा आवाज होत असता, मवाब नष्ट होईल; मी त्याच्यातल्या शास्त्यांना कापून टाकीन, व त्याच्याबरोबर त्याच्या सर्व सरदारांना मारून टाकीन,” असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो, “यहूदाचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण त्यांनी परमेश्वराचे नियमशास्त्र धिक्कारले आहे, त्यांनी त्याचे विधी पाळले नाहीत; व त्यांचे वाडवडील ज्या खोट्या गोष्टींना अनुसरले त्यांच्या योगे ते बहकले आहेत. त्यामुळे मी यहूदावर अग्नी पाठवीन, तो यरुशलेमेचे महाल जाळून भस्म करील.” परमेश्वर म्हणतो, “इस्राएलाचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण ते रुप्यासाठी नीतिमानास विकतात, एका जोड्यासाठी गरिबास विकतात; ते गरिबांची मस्तके धुळीत लोळवतात, ते दीनांच्या मार्गात आडवे येतात, माझ्या पवित्र नामास बट्टा लावण्याकरता मुलगा व बाप एकाच तरुणीकडे जातात. गहाण घेतलेली वस्त्रे घालून ते प्रत्येक वेदीजवळ निजतात आणि आपल्या दैवतांच्या1 मंदिरात घेतलेल्या दंडाचा द्राक्षारस प्राशन करतात.