YouVersion लोगो
सर्च आयकॉन

आमोस 1:1-5

आमोस 1:1-5 MARVBSI

तकोवा येथील मेंढपाळांतला आमोस ह्याला, यहूदाचा राजा उज्जीया व इस्राएलाचा राजा योवाशाचा पुत्र यराबाम ह्यांच्या काळात, भूमिकंपापूर्वी दोन वर्षे, इस्राएलाविषयी दृष्टान्तरूपाने प्राप्त झालेली वचने ही : तो म्हणाला, “परमेश्वर सीयोनेतून गर्जना करतो, यरुशलेमेतून आपला शब्द ऐकवतो, मेंढपाळांची कुरणे शोक करतात व कर्मेलाचा माथा सुकून गेला आहे.” परमेश्वर म्हणतो, “दिमिष्काचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण मळणी करण्याच्या लोखंडी यंत्रांनी त्यांनी गिलादाला मळले. पण मी हजाएलाच्या घरावर अग्नी पाठवीन; तो बेन-हदाद ह्याचे महाल जाळून भस्म करील. दिमिष्काचा अडसर मोडून टाकीन, आवेन खोर्‍यातील सिंहासनारूढ असलेला व बेथ-एदनाचा राजवेत्रधारी ह्यांचा निःपात करीन; अरामाच्या लोकांना पाडाव करून कीरास नेतील,” असे परमेश्वर म्हणतो.