नंतर त्यांनी साक्ष देऊन प्रभूचे वचन गाजवल्यावर ते यरुशलेमेत परत आले, आणि येताना त्यांनी शोमरोनी लोकांच्या पुष्कळशा गावांतून सुवार्ता सांगितली. इकडे प्रभूच्या दूताने फिलिप्पाला म्हटले, “ऊठ, जी वाट यरुशलेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा; ती ओसाड आहे.” मग तो उठला व निघाला; आणि पाहा, एक कूशी1 षंढ, कूशी1 लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी होता व त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते; तो यरुशलेमेत उपासनेसाठी आला होता. तो परत जाताना आपल्या रथात बसून यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचत होता. तेव्हा आत्म्याने फिलिप्पाला सांगितले, “जा, त्याचा रथ गाठ.” फिलिप्प धावत गेला आणि त्याने त्याला यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचताना ऐकले; त्यावर तो म्हणाला, “आपण जे वाचत आहात ते आपल्याला समजते काय?” त्याने म्हटले, “कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार?” मग त्याने फिलिप्पाला आपल्याजवळ येऊन बसण्यास वर बोलावले. तो जो शास्त्रलेख वाचत होता तो असा : “त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले; आणि जसे कोकरू कातरणार्याच्या पुढे गप्प असते, तसा तो आपले तोंड उघडत नाही. त्याच्या लीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही. त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील? कारण त्याचा जीव पृथ्वीवरून घेतला गेला.” तेव्हा षंढाने फिलिप्पाला म्हटले, “मला कृपा करून सांगा, संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो, स्वतःविषयी किंवा दुसर्या कोणाविषयी?” तेव्हा फिलिप्पाने बोलण्यास आरंभ केला व ह्या शास्त्रलेखापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली. मग वाटेने जात असता ते पाणवठ्याजवळ आले, तेव्हा षंढ म्हणाला, “पाहा हे पाणी; मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?” (फिलिप्पाने म्हटले, “जर आपण आपल्या सर्व अंतःकरणाने विश्वास धरता तर योग्य आहे.” त्याने उत्तर दिले, “येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असा मी विश्वास धरतो.”)2
प्रेषितांची कृत्ये 8 वाचा
ऐका प्रेषितांची कृत्ये 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांची कृत्ये 8:25-37
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ