मग तो बरा झालेला पांगळा पेत्र व योहान ह्यांना बिलगून राहिला असता सर्व लोक आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे शलमोनाची देवडी नावाच्या ठिकाणी धावत आले. हे पाहून पेत्राने लोकांना म्हटले, “अहो इस्राएल लोकांनो, ह्याचे आश्चर्य का करता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने ह्याला चालायला लावले आहे असे समजून आमच्याकडे निरखून का पाहता? अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव, ह्याने आपला ‘सेवक’ येशू, ह्याचा गौरव केला आहे; त्याला तुम्ही धरले व पिलाताने त्याला सोडून देण्याचा निश्चय केला असताही त्याच्यासमक्ष तुम्ही त्याला नाकारले. जो पवित्र व नीतिमान त्याला तुम्ही नाकारले, आणि ‘खुनी पुरुष आम्हांला द्या’ अशी मागणी केली. आणि तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जिवे मारले; पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले ह्याचे आम्ही साक्षी आहोत. त्याच्याच नावावरील विश्वासामुळे त्या नावाने ह्या ज्या माणसाला तुम्ही पाहता व ओळखता त्याला शक्तिमान केले आहे. त्याच्या द्वारे असलेल्या विश्वासाने ह्याला तुम्हा सर्वांसमक्ष ही शरीरसंपत्ती प्राप्त झाली आहे. बंधुजनहो, तुम्ही, तसेच तुमच्या अधिकार्यांनीही जे केले ते अज्ञानामुळे केले हे मी जाणून आहे. परंतु देवाने, आपल्या ख्रिस्ताने दुःख सहन करावे असे जे सर्व संदेष्ट्यांच्या मुखाने पूर्वी सांगितले होते ते त्याने त्याप्रमाणे पूर्ण केले. तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावीत म्हणून पश्चात्ताप करा व वळा; अशासाठी की, विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावेत; आणि तुमच्याकरता पूर्वी नेमलेला ख्रिस्त येशू ह्याला त्याने पाठवावे. सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाने सांगितले त्या काळापर्यंत येशूला स्वर्गात राहणे प्राप्त आहे. मोशेनेही म्हटलेच आहे, ‘प्रभू देव तुमच्यासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या बांधवांमधून उभा करील; तो जे काही तुम्हांला सांगेल त्याप्रमाणे सर्व गोष्टीत त्याचे ऐका. आणि असे होईल की, जो कोणी त्या संदेष्ट्याचे ऐकणार नाही तो लोकांतून अगदी नष्ट केला जाईल.’ आणखी शमुवेलापासून परंपरेने जितके संदेष्टे बोलले तितक्या सर्वांनी ह्या दिवसांविषयी सांगितले. तुम्ही संदेष्ट्यांचे पुत्र आहात, आणि ‘तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील’ असे अब्राहामाशी बोलून देवाने तुमच्या पूर्वजांबरोबर केलेल्या कराराचेही तुम्ही पुत्र आहात. देवाने आपल्या ‘सेवकाला’ उठवून प्रथम तुमच्याकडे पाठवले, ह्यासाठी की, त्याने तुम्हा प्रत्येकाला तुमच्या दुष्कृत्यांपासून वळून जाण्याचा आशीर्वाद देत जावा.”
प्रेषितांची कृत्ये 3 वाचा
ऐका प्रेषितांची कृत्ये 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांची कृत्ये 3:11-26
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ