तो पायर्यांवर आला तेव्हा असे झाले की, लोकांच्या दांडगाईमुळे शिपायांनी त्याला उचलून नेले; कारण लोकांचा समुदाय मागे चालत असून, “त्याची वाट लावा,” असे ओरडत होता. मग पौलाला गढीत नेणार इतक्यात त्याने सरदाराला म्हटले, “मला आपल्याबरोबर काही बोलायची परवानगी मिळेल का?” तो म्हणाला, “हेल्लेणी भाषा तुला येते काय? ज्या मिसर्याने थोड्या दिवसांमागे बंड उठवून त्या चार हजार मारेकर्यांना रानात नेले तोच तू आहेस की नाही?” तेव्हा पौलाने म्हटले, “मी किलिकियातील तार्सकर यहूदी आहे; हलक्यासलक्या नगराचा राहणारा नव्हे. मी आपल्याला विनंती करतो की, लोकांबरोबर बोलण्याची मला परवानगी द्या.” त्याने परवानगी दिल्यावर पौलाने पायर्यांवर उभे राहून लोकांना हाताने खुणावले; आणि अगदी शांत झाल्यावर तो त्यांच्याबरोबर इब्री भाषेत येणेप्रमाणे बोलला
प्रेषितांची कृत्ये 21 वाचा
ऐका प्रेषितांची कृत्ये 21
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांची कृत्ये 21:35-40
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ