प्रेषितांची कृत्ये 20:36-38
प्रेषितांची कृत्ये 20:36-38 MARVBSI
असे बोलल्यावर त्याने गुडघे टेकून त्या सर्वांबरोबर प्रार्थना केली. तेव्हा ते सर्व फार रडले व त्यांनी पौलाच्या गळ्यात गळा घालून त्याचे पुष्कळ मुके घेतले. ‘माझे तोंड तुमच्या दृष्टीस ह्यापुढे पडणार नाही,’ असे जे त्याने म्हटले होते त्यावरून त्यांना विशेष दु:ख झाले. मग त्यांनी त्याला तारवापर्यंत पोहचवले.