तेव्हा पौल अरीयपगाच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला : “अहो अथेनैकरांनो, तुम्ही सर्व बाबतींत धर्मभोळे (देवदेवतांना फार मान देणारे) आहात असे मला दिसते. कारण मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तू पाहताना, ‘अज्ञात देवाला’ ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली. ज्यांचे तुम्ही अज्ञानाने भजन करता ते मी तुम्हांला जाहीर करतो. ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही; आणि त्याला काही उणे आहे, म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही; कारण जीवन, प्राण व सर्वकाही तो स्वतः सर्वांना देतो.
प्रेषितांची कृत्ये 17 वाचा
ऐका प्रेषितांची कृत्ये 17
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांची कृत्ये 17:22-25
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ