प्रेषितांची कृत्ये 17:22-23
प्रेषितांची कृत्ये 17:22-23 MARVBSI
तेव्हा पौल अरीयपगाच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला : “अहो अथेनैकरांनो, तुम्ही सर्व बाबतींत धर्मभोळे (देवदेवतांना फार मान देणारे) आहात असे मला दिसते. कारण मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तू पाहताना, ‘अज्ञात देवाला’ ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली. ज्यांचे तुम्ही अज्ञानाने भजन करता ते मी तुम्हांला जाहीर करतो.