YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 16:23-26

प्रेषितांची कृत्ये 16:23-26 MARVBSI

मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदिशाळेत टाकून त्यांनी बंदिशाळेच्या नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला. त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना आतल्या बंदिखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यांत अडकवले. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करत असता व गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाये डगमगले; सर्व दरवाजे लगेच उघडले व सर्वांची बंधने तुटली.

प्रेषितांची कृत्ये 16:23-26 साठी चलचित्र