YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 15:36-40

प्रेषितांची कृत्ये 15:36-40 MARVBSI

मग काही दिवसानंतर पौलाने बर्णबाला म्हटले, “ज्या ज्या नगरात आपण प्रभूच्या वचनाची घोषणा केली तेथे पुन्हा जाऊन बंधुजनांना भेटून ते कसे आहेत हे पाहू या.” बर्णबाची इच्छा होती की, ज्याला मार्कही म्हणत त्या योहानाला बरोबर घ्यावे. परंतु पौलाला वाटले की, पंफुल्याहून जो आपल्याला सोडून गेला होता व आपल्याबरोबर काम करण्यास आला नाही त्याला सोबतीस घेणे योग्य नाही. ह्यावरून त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद उपस्थित होऊन ते एकमेकांपासून वेगळे झाले आणि बर्णबा मार्काला घेऊन तारवात बसून कुप्रास गेला; पण पौलाने सीलाला निवडून घेतले आणि बंधुजनांनी त्याला प्रभूच्या कृपेवर सोपवल्यावर तो तेथून निघाला.

प्रेषितांची कृत्ये 15:36-40 साठी चलचित्र