पेत्राचे हे भाषण चालू असतानाच वचन ऐकणार्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला. मग परराष्ट्रीयांवरही पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव झाला आहे असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या विश्वास ठेवणार्या व सुंता झालेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले. कारण त्यांनी त्यांना अनेक भाषांतून बोलताना व देवाची थोरवी गाताना ऐकले. तेव्हा पेत्राने म्हटले, “आम्हांला मिळाला तसा पवित्र आत्मा ज्यांना मिळाला आहे त्यांचा बाप्तिस्मा होऊ नये म्हणून कोणाच्याने पाण्याची मनाई करवेल?” मग ‘प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा व्हावा’ अशी त्याने आज्ञा केली. तेव्हा काही दिवस राहावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली.
प्रेषितांची कृत्ये 10 वाचा
ऐका प्रेषितांची कृत्ये 10
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांची कृत्ये 10:44-48
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ