YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 तीमथ्य 1:1-7

2 तीमथ्य 1:1-7 MARVBSI

प्रिय मुलगा तीमथ्य ह्याला, ख्रिस्त येशूमधील जीवनविषयक वचनानुसार देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून : देवपिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्यांच्यापासून कृपा, दया व शांती असो. मी आपल्या प्रार्थनांत रात्रंदिवस तुझे स्मरण अखंड करतो आणि तुझे अश्रू मनात आणून तुझ्या भेटीने मी आनंदभरित व्हावे म्हणून तुला भेटण्याची फार उत्कंठा बाळगतो; तुझ्यामध्ये असलेल्या निष्कपट विश्वासाची मला आठवण होऊन, ज्या देवाची माझ्या पूर्वजांपासून चालत आलेली सेवा मी शुद्ध विवेकभावाने करतो, त्याचे मी आभार मानतो. तो विश्वास पहिल्याने तुझी आजी लोईस हिच्या ठायी होता; तुझी आई युनीके हिच्या ठायी होता; आणि तोच तुझ्याही ठायी आहे असा मला भरवसा आहे. ह्या कारणास्तव मी तुला आठवण देतो की, देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळे तुझ्या ठायी आहे, ते प्रज्वलित कर. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे.