YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 थेस्सल 2:13-17

2 थेस्सल 2:13-17 MARVBSI

पण बंधुजनहो, प्रभूच्या प्रिय जनांनो, तुमच्याविषयी आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे; कारण आत्म्याच्या द्वारे होणार्‍या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हांला प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे. त्यात त्याने तुम्हांला आमच्या सुवार्तेच्या द्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे. तर मग बंधूंनो, स्थिर राहा, आणि तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे संप्रदाय तुम्हांला शिकवले ते बळकट धरून राहा. आपला प्रभू येशू ख्रिस्त हा, आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून युगानुयुगाचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली तो देव आपला पिता, तुमच्या मनाचे सांत्वन करो, आणि प्रत्येक चांगल्या कृतीत व उक्तीत तुम्हांला स्थिर करो.