ते देवाच्या यथार्थ न्यायाचे प्रदर्शक आहे; तो न्याय हा की, ज्यासाठी तुम्ही दु:ख सोसत आहात त्या देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरले जावे. तुमच्यावर संकट आणणार्या लोकांची परत संकटाने फेड करणे आणि संकट सोसणार्या तुम्हांला आमच्याबरोबर विश्रांती देणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे, म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रकट होईल; तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता मानत नाहीत त्यांचा तो सूड उगवील.
2 थेस्सल 1 वाचा
ऐका 2 थेस्सल 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 2 थेस्सल 1:5-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ