कबसेल येथला एक माणूस होता; त्याने पुष्कळ पराक्रम केले होते; त्याच्या यहोयादा नामक पुत्राचा बनाया म्हणून एक पुत्र होता, त्याने मवाबी अरीएल ह्याच्या दोघा पुत्रांना ठार मारले; आणि बर्फाच्या दिवसांत कूपात उतरून एका सिंहाला ठार केले. त्याने एका धिप्पाड मिसरी पुरुषाला ठार मारले; त्या मिसर्याच्या हाती भाला होता, पण बनाया केवळ एक काठी घेऊन त्याच्यावर चालून गेला; व त्याने त्या मिसर्याच्या हातचा भाला हिसकावून घेऊन त्याच भाल्याने त्याचा वध केला. असे करून यहोयादाचा पुत्र बनाया ह्याने त्या तिघा वीरांमध्ये नाव मिळवले. त्या तिघांहून त्याची महती मोठी होती तरी पहिल्या तिघांच्या योग्यतेस तो पोहचला नाही. दाविदाने त्याला आपल्या हुजरातीवर नेमले.
२ शमुवेल 23 वाचा
ऐका २ शमुवेल 23
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ शमुवेल 23:20-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ