YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 21:1-7

२ शमुवेल 21:1-7 MARVBSI

दाविदाच्या कारकिर्दीत लागोपाठ तीन वर्षे दुष्काळ पडला; तेव्हा दाविदाने परमेश्वरासमोर जाऊन प्रश्‍न केला. परमेश्वराने उत्तर दिले, “शौल व त्याचे खुनी घराणे ह्यांच्यामुळे हा दुष्काळ पडला आहे, कारण त्याने गिबोनी लोकांचा संहार केला.” राजाने गिबोनी लोकांना बोलावून त्यांच्याशी बोलणे केले. (हे गिबोनी लोक इस्राएल लोकांपैकी नसून अवशिष्ट अमोर्‍यांपैकी होते; इस्राएल लोकांनी त्यांच्याशी शपथ वाहून करार केला होता; पण इस्राएल लोक व यहूदी लोक ह्यांच्या अभिमानास्तव शौलाने गिबोनी लोकांचा संहार करण्याचा प्रयत्न केला होता.) दाविदाने गिबोनी लोकांना विचारले, “तुमच्यासाठी मी काय करू? असे कोणत्या प्रकारचे प्रायश्‍चित्त मी करू की जेणेकडून तुम्ही परमेश्वराच्या वतनाचे अभीष्ट चिंताल?” गिबोनी लोक त्याला म्हणाले, “शौल व त्याचे घराणे ह्यांच्याशी आमचा सोन्यारुप्यासंबंधी काही देणेघेणे नाही; तसेच इस्राएलातील कोणा पुरुषाला जिवे मारायचे आम्हांला कारण नाही.” तो त्यांना म्हणाला, “तुम्ही सांगाल ते मी तुमच्यासाठी करीन.” ते राजाला म्हणाले, “ज्या पुरुषाने आमचा नाश केला आणि आमचा निःपात व्हावा आणि इस्राएल देशात आमचे कोणी उरू देऊ नये असे योजले होते, त्याच्या वंशातले सात जण आमच्या हाती द्या, म्हणजे परमेश्वराने निवडलेल्या शौलाच्या गिब्यात परमेश्वराप्रीत्यर्थ आम्ही त्यांना फाशी देतो.” तेव्हा राजा म्हणाला, “मी त्यांना देईन.” दावीद व शौलाचा पुत्र योनाथान ह्यांची परमेश्वराच्या नावाने आणभाक झाली होती म्हणून शौलाचा नातू योनाथानाचा पुत्र मफीबोशेथ ह्याची राजाने गय केली.