मग अलीशा दिमिष्काला गेला; त्या वेळी अरामाचा राजा बेन-हदाद आजारी पडला होता; तेव्हा “देवाचा माणूस आला आहे” असे कोणी त्याला सांगितले. तेव्हा राजाने हजाएलाला सांगितले, “हाती नजराणा घेऊन देवाच्या माणसाच्या भेटीला जा आणि त्याच्या द्वारे परमेश्वराला प्रश्न कर की मी ह्या रोगातून बरा होईन काय?” तेव्हा हजाएल दिमिष्कातील सर्व उत्तम उत्तम वस्तू चाळीस उंटांवर लादून त्याच्या भेटीस गेला व त्याच्यासमोर उभा राहून म्हणाला, “तुझा पुत्र अरामाचा राजा बेन-हदाद ह्याने तुला असे विचारायला मला पाठवले आहे की मी ह्या रोगातून उठेन की नाही?” अलीशा त्याला म्हणाला, “जाऊन त्याला सांग, तू खात्रीने बरा होशील;1 तथापि परमेश्वराने मला कळवले आहे की तो अवश्य मरेल.” तो त्याच्याकडे एकसारखा टक लावून पाहू लागला. त्याने इतकी टक लावली की तो भांबावून गेला; आणि देवाचा माणूस रडू लागला. हजाएलाने विचारले, “माझे स्वामी का रडत आहेत?” त्याने म्हटले, “तू इस्राएल लोकांना उपद्रव देणार; त्यांची तटबंदी नगरे जाळून टाकणार, त्यांचे तरुण पुरुष तलवारीने वधणार; त्यांची मुलेबाळे तू आपटून मारणार; त्यांच्या गर्भवती स्त्रिया तू चिरून टाकणार; हे सर्व मला ठाऊक आहे म्हणून.” हजाएल म्हणाला, “आपला दास तर केवळ कुत्रा आहे; तो असली मोठी कृत्ये कशी करणार?” अलीशा म्हणाला, “तू अरामाचा राजा होणार हे परमेश्वराने मला कळवले आहे.” तो अलीशापासून निघून आपल्या धन्याकडे गेला; त्याने त्याला विचारले, “अलीशा तुला काय म्हणाला?” त्याने उत्तर दिले की, “आपण खात्रीने बरे व्हाल असे त्याने सांगितले.” दुसर्या दिवशी त्याने एक रजई घेऊन ती पाण्यात भिजवून त्याच्या तोंडावर पसरली; त्यामुळे तो मरण पावला. त्याच्या जागी हजाएल राजा झाला.
२ राजे 8 वाचा
ऐका २ राजे 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ राजे 8:7-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ