YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 8:16-24

२ राजे 8:16-24 MARVBSI

इस्राएलाचा राजा अहाब ह्याचा पुत्र योराम ह्याच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी यहोशाफाट यहूदाचा राजा होता त्या वेळी त्याचा पुत्र यहोराम हा राज्य करू लागला. तो बत्तीस वर्षांचा असता राज्य करू लागला; त्याने यरुशलेमेत आठ वर्षे राज्य केले. अहाबाच्या घराण्याप्रमाणे, इस्राएलाच्या राजांच्या रीतीप्रमाणे तो चालला, त्याने अहाबाच्या कन्येशी लग्न केले; परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. तथापि आपला सेवक दावीद ह्याच्यास्तव यहूदाचा नाश करावा असे परमेश्वराला वाटले नाही, कारण त्याने त्याला वचन दिले होते की तुझ्या संतानाच्या ठायी मी तुझा दीप कायम ठेवीन. त्याच्या कारकिर्दीत अदोमाने यहूदाचे स्वामित्व झुगारून देऊन आपला एक राजा नेमला. तेव्हा योराम आपले सर्व रथ बरोबर घेऊन साईर येथे गेला; ज्या अदोमी लोकांनी त्याला घेरले होते त्यांना व रथांच्या नायकांना त्याने रात्रीच्या वेळी उठून मार दिला; तेव्हा लोक आपापल्या डेर्‍यांकडे पळून गेले. अदोमाने यहूदाचे स्वामित्व झुगारून दिले; ते आजवर तसेच आहे. ह्याच सुमारास लिब्नाने यहूदाचे स्वामित्व झुगारून दिले. योरामाने केलेल्या बाकीच्या गोष्टी व त्याने केलेली सगळी कामे ह्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? नंतर योराम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्याला दावीदपुरात त्याच्या पूर्वजांमध्ये मूठमाती दिली; त्याचा पुत्र अहज्या हा त्याच्या जागी राजा झाला.