YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 6:15-17

२ राजे 6:15-17 MARVBSI

सकाळी देवाच्या माणसाचा सेवक उठून बाहेर आला तेव्हा सैन्याने घोडे व रथ ह्यांसह नगराला वेढा दिला आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो आपल्या धन्याला म्हणाला, “स्वामी, हायहाय! आता आपण काय करावे?” तो म्हणाला, “भिऊ नकोस; त्यांच्या पक्षाचे आहेत त्यांच्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत.” अलीशाने प्रार्थना केली की, “हे परमेश्वरा, ह्याचे डोळे उघड, ह्याला दृष्टी दे.” परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले, तो पाहा, अलीशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ ह्यांनी व्यापून गेला आहे असे त्याला दिसले.