YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 4:1-7

२ राजे 4:1-7 MARVBSI

एकदा संदेष्ट्याच्या शिष्यांच्या स्त्रियांपैकी एकीने अलीशाकडे गार्‍हाणे केले; ती म्हणाली, “तुझा सेवक, माझा नवरा, मरून गेला आहे; तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. त्याचा सावकार माझ्या दोन पुत्रांना दास करून नेण्यासाठी आला आहे.” अलीशाने तिला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग; तुझ्या घरात काय आहे?” ती म्हणाली, “एक घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काहीएक नाही.” तो तिला म्हणाला, “तू जा आणि बाहेरून आपल्या शेजार्‍यापाजार्‍यांकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण. मग आपल्या पुत्रांसह घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यांत तेल ओत; आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव.” ती त्याच्यापासून गेली आणि आपल्या पुत्रांसह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले; ते तिच्याकडे भांडी आणत ती भांडी ती भरत जाई. सर्व भांडी भरल्यावर ती आपल्या पुत्रांना म्हणाली, “मला आणखी एक भांडे आणून द्या;” त्यांनी म्हटले, “आता एकही भांडे उरले नाही;” तेव्हा तेल वाढायचे थांबले. तिने जाऊन देवाच्या माणसाला हे सांगितले. तो म्हणाला, “जा, तेल विकून आपले कर्ज फेड व जे शिल्लक राहील त्यावर आपला व आपल्या पुत्रांचा निर्वाह कर.” अलीशा व शूनेम येथील स्त्री