ते पाहून अलीशा मोठ्याने म्हणाला, “माझ्या बापा! माझ्या बापा! इस्राएलाच्या रथांनो! इस्राएलाच्या राउतांनो!” तो पुन्हा त्याच्या नजरेस पडला नाही; तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडून त्यांचे दोन-दोन तुकडे केले. एलीयाचा जो झगा त्याच्या अंगावरून खाली पडला होता तो त्याने उचलून घेतला आणि तो परत जाऊन यार्देनेच्या तीरावर उभा राहिला. एलीयाच्या अंगावरून पडलेला झगा पाण्यावर मारून तो म्हणाला, “एलीयाचा देव परमेश्वर कोठे आहे?” त्याने तो पाण्यावर मारताच पाणी दुभंगले आणि अलीशा पलीकडे गेला.
२ राजे 2 वाचा
ऐका २ राजे 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ राजे 2:12-14
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ