YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 18:1-6

२ राजे 18:1-6 MARVBSI

इस्राएलाचा राजा होशे बिन एला ह्याच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी यहूदाचा राजा हिज्कीया बिन आहाज राज्य करू लागला. तो राज्य करू लागला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत एकोणतीस वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव अबी असे होते; ती जखर्‍याची कन्या. त्याचा पूर्वज दावीद ह्याच्या सर्व करणीप्रमाणे तो परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते करी. त्याने उच्च स्थाने काढून टाकली, मूर्तिस्तंभ फोडले, अशेरा मूर्तींचा उच्छेद केला व मोशेने केलेल्या पितळी सर्पाचे चूर्ण केले; कारण, हा काळपावेतो इस्राएल लोक त्यापुढे धूप जाळत असत; त्याला नहुश्तान (पितळेचा तुकडा) हे नाव दिले होते. इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्यावर त्याचा भाव असे; त्याच्यामागून यहूदाच्या सर्व राजांमध्ये त्याच्या तोडीचा कोणी होऊन गेला नाही व त्याच्यापूर्वीही झाला नाही. तो परमेश्वराला धरून राहिला; त्याला अनुसरण्याचे त्याने सोडले नाही; परमेश्वराने मोशेला ज्या आज्ञा विहित केल्या होत्या त्या त्याने पाळल्या.