YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 16:1-5

२ राजे 16:1-5 MARVBSI

पेकह बिन रमाल्या ह्याच्या कारकिर्दीच्या सतराव्या वर्षी यहूदाचा राजा आहाज बिन योथाम राज्य करू लागला. आहाज राज्य करू लागला तेव्हा तो वीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत सोळा वर्षे राज्य केले; त्याचा पूर्वज दावीद ह्याने आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे योग्य केले होते त्याप्रमाणे त्याने केले नाही. तो इस्राएलाच्या राजांच्या मार्गाने चालला; ज्या राष्ट्रांना परमेश्वराने इस्राएल लोकांपुढून घालवले होते त्यांच्या अमंगळ आचारांना अनुसरून त्याने आपल्या पुत्राचा अग्नीत होम करून त्याला अर्पण केले. तो उच्च स्थानी, पहाडांवर व प्रत्येक हिरव्या वृक्षाखाली यज्ञ करत असे व धूप जाळत असे. मग अरामाचा राजा रसीन आणि इस्राएलाचा राजा पेकह बिन रमाल्या हे यरुशलेमेवर चढाई करून युद्धास आले; त्यांनी आहाजाला वेढा दिला पण त्यांना त्याला जिंकता आले नाही.