परमेश्वराने राजाला अशी शिक्षा केली की तेणेकरून तो आमरण कोडी झाला; तो निराळ्या घरात राहत असे. राजपुत्र योथाम हा त्याचा खानगी कारभारी होऊन देशातील लोकांचा न्यायनिवाडा करत असे. अजर्याच्या बाकीच्या कृत्यांचे व त्याने जे काही केले त्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? अजर्या3 आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्यांनी त्याला दावीदपुरात त्याच्या पितरांमध्ये मूठमाती दिली. त्याचा पुत्र योथाम हा त्याच्या जागी राजा झाला.
२ राजे 15 वाचा
ऐका २ राजे 15
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ राजे 15:5-7
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ