इस्राएलाचा राजा पेकह बिन रमाल्या ह्याच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी यहूदाचा राजा योथाम बिन उज्जीया राज्य करू लागला. तो राज्य करू लागला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत सोळा वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव यरुशा असे होते; ती सादोकाची कन्या. परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते त्याने केले; त्याचा बाप उज्जीया ह्याच्या एकंदर वागणुकीप्रमाणे तो वागला. तरी उच्च स्थाने काढून टाकण्यात आली नव्हती; लोक अद्यापि उच्च स्थानी यज्ञ करत व धूप जाळत होते. परमेश्वराच्या मंदिराचा वरचा दरवाजा त्याने बांधला. योथामाची बाकीची कृत्ये व जे काही त्याने केले त्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?
२ राजे 15 वाचा
ऐका २ राजे 15
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ राजे 15:32-36
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ