यहूदाचा राजा अजर्या ह्याच्या कारकिर्दीच्या पन्नासाव्या वर्षी पकह्या बिन मनहेम शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला; त्याने दोन वर्षे राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले; नबाटपुत्र यराबाम ह्याने इस्राएलाकडून जी पापकर्मे करवली ती त्याने सोडून दिली नाहीत. त्याचा सरदार रमाल्याचा पुत्र पेकह ह्याने त्याच्याशी फितुरी करून शोमरोनाच्या राजवाड्याच्या मनोर्यात त्याला व त्याच्याबरोबर अर्गोब व अरये ह्यांना वधले; पेकहाबरोबर पन्नास गिलादी लोक होते; त्यांना वधून त्याच्या जागी तो राजा झाला. पकह्याची बाकीची कृत्ये व जे काही त्याने केले त्या सर्वांचे वर्णन इस्राएलांच्या राजांच्या बखरीत केले आहे, ते पाहा.
२ राजे 15 वाचा
ऐका २ राजे 15
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ राजे 15:23-26
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ