इस्राएलाचा राजा यहोआहाज1 ह्याचा पुत्र योवाश ह्याच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी यहूदाचा राजा योवाश ह्याचा पुत्र अमस्या राज्य करू लागला. तो राज्य करू लागला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत एकोणतीस वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव यहोअदान होते, ती यरुशलेमेची होती. परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करी; तरी त्याचा पूर्वज दावीद ह्याच्या तोडीचा तो नव्हता; त्याचा बाप योवाश ह्याच्या करणीप्रमाणे त्याची सगळी करणी होती. पण उच्च स्थाने काही काढून टाकण्यात आली नव्हती; लोक अजूनही त्या स्थानी यज्ञ करत व धूप जाळत. त्याच्या हाती राजसत्ता बळकट झाली तेव्हा त्याचा बाप जो राजा त्याचा घात ज्या चाकरांनी केला होता त्यांना त्याने जिवे मारले. पण त्या खून करणार्यांची मुलेबाळे त्याने जिवे मारली नाहीत; कारण मोशेच्या नियमशास्त्रात परमेश्वराने अशी आज्ञा दिली आहे की, “पुत्रांसाठी पित्यांना, पित्यांसाठी पुत्रांना मारू नये; जो तो आपल्याच पापामुळे प्राणास मुकावा.” त्याने क्षार खोर्यात अदोमाच्या दहा हजार लोकांना मारून टाकले; सेला नगर लढून घेतले व त्याचे नाव बदलून ते यकथेल असे ठेवले; आजवर ते नाव चालू आहे. मग अमस्याने इस्राएलाचा राजा यहोआश बिन यहोआहाज बिन येहू ह्याला जासुदांच्या हाती निरोप पाठवला की, “चल, आपण सामना करू.” इस्राएलाचा राजा यहोआश ह्याने यहूदाचा राजा अमस्या ह्याला सांगून पाठवले की, “लबानोनातल्या काटेझुडपाने लबानोनातल्याच एका गंधसरूकडे मागणी केली की, ‘तुझी मुलगी माझ्या मुलास दे;’ लबानोनात असलेला एक वनपशू त्या वाटेने गेला व त्याने ते काटेझुडूप पायांखाली तुडवून टाकले. तू अदोमाचा मोड केल्यामुळे तुझे हृदय उन्मत्त झाले आहे; त्याविषयी फुशारकी मारत आपल्या घरी बस; तू पतन पावशील व तुझ्याबरोबर यहूदा पतन पावेल; तर तू होऊन अरिष्टाला का आमंत्रण करत आहेस?” अमस्या काही केल्या ऐकेना. तेव्हा इस्राएलाचा राजा यहोआश चढाई करून गेला; तो व यहूदाचा राजा अमस्या ह्यांचा यहूदा देशातील बेथ-शेमेश येथे सामना झाला. इस्राएलापुढे यहूदाची त्रेधा उडाली आणि ज्याने-त्याने आपापल्या डेर्याकडे पळ काढला. इस्राएलाचा राजा यहोआश ह्याने यहूदाचा राजा अमस्या बिन यहोआश बिन अहज्या ह्याला बेथ-शेमेश येथे पकडले; त्याने यरुशलेमेस जाऊन एफ्राइमी वेशीपासून कोपरावेशीपर्यंत यरुशलेमेचा चारशे हात कोट पाडून टाकला. सोने, रुपे, परमेश्वराच्या मंदिरात व राजभवनाच्या भांडारात त्याला सापडली तेवढी सगळी पात्रे व कैदी घेऊन तो शोमरोनास परत गेला.
२ राजे 14 वाचा
ऐका २ राजे 14
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ राजे 14:1-14
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ