पुढे अरामाचा राजा हजाएल ह्याने स्वारी करून गथ घेतले आणि नंतर यरुशलेमेकडे आपला मोर्चा फिरवला. तेव्हा यहूदाचा राजा यहोआश ह्याने असे केले : त्याचे वाडवडील, यहोशाफाट, यहोराम व अहज्या ह्या यहूदाच्या राजांनी व त्याने स्वतः ज्या वस्तू परमेश्वराला वाहिल्या होत्या त्या, आणि परमेश्वराच्या मंदिराच्या व राजभवनाच्या भांडारात जेवढे सोने सापडले ते सर्व घेऊन त्याने अरामाचा राजा हजाएल ह्याच्याकडे पाठवले; तेव्हा तो यरुशलेमेजवळून निघून गेला. यहोआशाची बाकीची कृत्ये व त्याने जे काही केले त्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? यहोआश राजाच्या चाकरांनी फितुरी केली आणि त्याला सिल्लाकडे जाणार्या रस्त्यावर मिल्लो नावाच्या वाड्यात जिवे मारले. योजाखार बिन शिमाथ व यहोजाबाद बिन शोमर ह्या त्याच्या चाकरांनी त्याला जिवे मारले; तो मेल्यावर त्यांनी त्याला दावीदपुरात त्याच्या वाडवडिलांच्या थडग्यात मूठमाती दिली; त्याचा पुत्र अमस्या त्याच्या जागी राजा झाला.
२ राजे 12 वाचा
ऐका २ राजे 12
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ राजे 12:17-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ