YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 योहान 1:6-11

2 योहान 1:6-11 MARVBSI

प्रीती हीच आहे की, आपण त्याच्या आज्ञांप्रमाणे चालावे. ती आज्ञा ही आहे की, जसे तुम्ही प्रारंभापासून ऐकले आहे तसे तुम्ही तिच्याप्रमाणे चालावे. कारण फसवणूक करणारी, म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त ह्याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत. फसवणूक करणारा व ख्रिस्तविरोधक असलाच आहे. आम्ही केलेले कार्य तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका, तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हांला मिळावे म्हणून खबरदारी घ्या. ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहता जो पुढेपुढेच जातो त्याला देव प्राप्त झाला नाही; जो शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र दोघांची प्राप्ती झाली आहे. हे शिक्षण न देणारा कोणी तुमच्याकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे क्षेमकुशल विचारू नका; कारण जो त्याचे स्वागत करतो तो त्याच्या दुष्कर्माचा भागीदार होतो.