म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी संपन्न व्हाल; त्या औदार्यावरून आमच्या द्वारे देवाचे आभारप्रदर्शन होते. ही सेवा केल्याने पवित्र जनांच्या गरजा पुरवल्या जातात; इतकेच केवळ नव्हे, तर तिच्या द्वारे देवाचे अधिकाधिक आभारप्रदर्शन झाल्याने ती सेवाही समृद्ध होते. ह्या सेवेच्या कसोटीमध्ये, तुम्ही ख्रिस्तसुवार्तेच्या पत्कराबाबत आज्ञाधारकपणा दाखवल्यामुळे आणि त्यांच्यासाठी व सर्वांसाठी दान देण्याचे तुमचे औदार्य ह्यांमुळे देवाचा गौरव होतो; आणि तुमच्यावर देवाची अपार कृपा असल्यामुळे ते तुमच्याकरता प्रार्थना करतात, व तुमच्याविषयी उत्कंठा बाळगतात. देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुती होवो.
२ करिंथ 9 वाचा
ऐका २ करिंथ 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ करिंथ 9:11-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ