YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ करिंथ 4:8-15

२ करिंथ 4:8-15 MARVBSI

आमच्यावर चोहोंकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही; आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही; आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही; आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही; आम्ही प्रभू येशूचा वध सर्वदा शरीरात वागवतो, अशा हेतूने की, येशूचे जीवनही आमच्या शरीरांत प्रकट व्हावे. कारण जे आम्ही जिवंत राहतो ते आम्ही येशूप्रीत्यर्थ सदाचेच मरणाच्या हाती सोपवलेले आहोत, ह्यासाठी की, येशूचे जीवनही आमच्या मर्त्य देहात प्रकट व्हावे. आमच्यामध्ये मरण, पण तुमच्यामध्ये जीवन आपले कार्य चालवते. ‘मी विश्वास धरला म्हणून बोललो,’ ह्या शास्त्रलेखानुसार जो विश्वासाचा आत्मा तोच आत्मा आमच्या ठायी असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतोही. हे आम्हांला ठाऊक आहे की, ज्याने प्रभू येशूला उठवले तो येशूबरोबर आम्हांलाही उठवील व तुमच्याबरोबर सादर करील. सर्वकाही तुमच्याकरता आहे, ह्यासाठी की, पुष्कळ जणांच्या द्वारे जी कृपा विपुल झाली ती देवाच्या गौरवार्थ अपार आभारप्रदर्शनाला साधनीभूत व्हावी.