YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ करिंथ 4:13-18

२ करिंथ 4:13-18 MARVBSI

‘मी विश्वास धरला म्हणून बोललो,’ ह्या शास्त्रलेखानुसार जो विश्वासाचा आत्मा तोच आत्मा आमच्या ठायी असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतोही. हे आम्हांला ठाऊक आहे की, ज्याने प्रभू येशूला उठवले तो येशूबरोबर आम्हांलाही उठवील व तुमच्याबरोबर सादर करील. सर्वकाही तुमच्याकरता आहे, ह्यासाठी की, पुष्कळ जणांच्या द्वारे जी कृपा विपुल झाली ती देवाच्या गौरवार्थ अपार आभारप्रदर्शनाला साधनीभूत व्हावी. म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही; परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे. कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते; आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो; कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत.