YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ करिंथ 3:7-18

२ करिंथ 3:7-18 MARVBSI

जिचा लेख दगडांवर कोरलेला असून जिचे पर्यवसान मृत्यूत होत असे ती सेवा एवढी तेजस्वी होती की ‘मोशेच्या चेहर्‍याचे तेज’ नाहीसे होत चालले असूनही इस्राएल लोकांना जर त्याच्या चेहर्‍याकडे टक लावून पाहवेना, तर आध्यात्मिक सेवा विशेषेकरून तेजस्वी होणार नाही काय? कारण ज्या सेवेचा परिणाम दंडाज्ञा ती जर तेजोमय होती, तर जिचा परिणाम नीतिमत्त्व ती किती विशेषेकरून अधिक तेजोमय असणार. इतकेच नव्हे, तर ‘जे तेजस्वी होते ते’ ह्या तुलनेत अपरंपार तेजापुढे तुलनेने ‘तेजोहीन ठरले’. नष्ट होत चाललेले जर तेजयुक्त आहे, तर जे शाश्वत ते कितीतरी अधिक तेजस्वी असणार. तर मग आम्हांला अशी आशा असल्यामुळे आम्ही फार धिटाईने बोलतो; इस्राएल लोकांनी जे नाहीसे होत चालले होते त्या तेजाकडे एकसारखी दृष्टी लावू नये ‘म्हणून मोशे आपल्या मुखावर आच्छादन घालत असे,’ तसे आम्ही करत नाही. परंतु त्यांची मने कठीण झाली; कारण जुना करार वाचून दाखवण्यात येतो तेव्हा तेच आच्छादन आजपर्यंत तसेच न काढलेले राहते; ते ख्रिस्तामध्ये नाहीसे होते. आजपर्यंत मोशेचा ग्रंथ वाचून दाखवण्यात येतो तेव्हा त्यांच्या अंत:करणावर आच्छादन राहते; परंतु त्यांचे अंत:करण प्रभूकडे वळले म्हणजे ‘आच्छादन काढले जाते.’ प्रभू आत्मा आहे;1 आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. परंतु आपल्या मुखांवर आच्छादन नसलेले आपण सर्व जण आरशाप्रमाणे ‘प्रभूच्या वैभवाचे’ प्रतिबिंब पाडत आहोत;2 आणि प्रभू जो आत्मा त्याच्या द्वारे, तेजस्वितेच्या परंपरेने, आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत.