तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही ह्याविषयी आपली परीक्षा करा; आपली प्रतीती पाहा, येशू ख्रिस्त तुमच्या ठायी आहे असे तुम्ही स्वतःसंबंधाने समजता ना? नाहीतर तुम्ही पसंतीस1 उतरलेले नाही. पसंतीस न उतरलेले असे आम्ही नाही हे तुम्ही ओळखाल अशी माझी आशा आहे. आम्ही देवाजवळ अशी प्रार्थना करतो की, तुम्ही काही वाईट करू नये; आम्ही पसंतीस उतरलेले दिसावे म्हणून नव्हे, तर आम्ही पसंतीस न उतरलेले असे असलो तरी तुम्ही चांगले करावे म्हणून. कारण सत्याविरुद्ध आम्हांला काही करता येत नाही, तर सत्यासाठी करता येते. जेव्हा आम्ही दुर्बळ असून तुम्ही सबळ असता तेव्हा आम्ही आनंद करतो; व तुम्ही परिपूर्ण व्हावे ह्यासाठीही प्रार्थना करतो.
२ करिंथ 13 वाचा
ऐका २ करिंथ 13
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ करिंथ 13:5-9
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ