YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ इतिहास 9:5-8

२ इतिहास 9:5-8 MARVBSI

ती राजाला म्हणाली, “आपली करणी व ज्ञान ह्यांविषयीची कीर्ती मी आपल्या देशात ऐकली ती खरी आहे; तथापि मी येऊन प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याशिवाय ह्या गोष्टीचा मला विश्वास येईना; आता पाहावे तर आपल्या ज्ञानाची अर्धीही थोरवी माझ्या कानी आली नव्हती. आपली कीर्ती मी ऐकली आहे तिच्याहून आपली कीर्ती अधिक आहे. धन्य आपले लोक, धन्य हे आपले सेवक; त्यांना आपणासमोर सतत तिष्ठत राहून आपल्या शहाणपणाचा लाभ घडत असतो. धन्य आपला देव परमेश्वर; त्याने आपणावर प्रसन्न होऊन आपल्या वतीने आपण राजा व्हावे म्हणून आपणाला आपल्या गादीवर स्थापन केले आहे; आपल्या देवाने इस्राएलावर प्रेम करून त्याची कायमची स्थापना करण्याचे म्हणून न्यायाचे व नीतीचे पालन करण्यासाठी त्याने आपणाला राजा केले आहे.”