YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ इतिहास 28:20-26

२ इतिहास 28:20-26 MARVBSI

ह्यामुळे अश्शूराचा राजा तिल्गथ-पिल्नेसर ह्याने त्याच्याकडे येऊन त्याला त्रस्त केले; त्याला साहाय्य केले नाही. आहाजाने परमेश्वराच्या मंदिरातून आणि राजाच्या व सरदारांच्या घरांतून धन घेऊन अश्शूरच्या राजाला दिले, तरी त्याचा त्याला काही उपयोग झाला नाही. संकटसमयी ह्या आहाज राजाने परमेश्वराचा अधिकच अपराध केला. दिमिष्काच्या ज्या दैवतांनी त्याला मार दिला होता त्यांना त्याने यज्ञ केले. तो म्हणाला, “अरामी राजांना त्यांच्या दैवतांनी साहाय्य केले तर मी त्यांना यज्ञ केल्यास मलाही ते साहाय्य करतील, पण ते त्याच्या व सर्व इस्राएलाच्या नाशास कारण झाले. आहाजाने देवाच्या मंदिरातील पात्रे जमा करून ती फोडूनतोडून टाकली; त्याने परमेश्वराच्या मंदिराची द्वारे बंद केली आणि यरुशलेमेच्या कोनाकोपर्‍यातून वेद्या बांधल्या. त्याने यहूदाच्या प्रत्येक नगरात अन्य दैवतांना धूप जाळण्यासाठी उच्च स्थाने बांधली आणि आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याला संतप्त केले. अथपासून इतिपर्यंतची त्याची बाकीची कृत्ये व त्याचे सर्व वर्तन हे यहूदा व इस्राएल ह्यांच्या राजांच्या बखरीत वर्णन केले आहे.