त्या वेळेस आहाज राजाने अश्शूरच्या राजाकडे जासूद पाठवून कुमक मागितली. कारण अदोमी लोकांनी पुन्हा येऊन यहूदास मार देऊन काही लोक पाडाव करून नेले होते. आणि पलिष्टी लोक तळवट व यहूदाचा दक्षिण प्रांत ह्यांतील नगरांवर स्वारी करून बेथ-शेमेश, अयालोन, खदेरोथ, सोखो व त्याच्या आसपासची खेडीपाडी, तिम्ना व त्याच्या आसपासची खेडीपाडी आणि गिम्जो व त्याच्या आसपासची खेडीपाडी ही सर्व काबीज करून त्यांत राहू लागले. इस्राएलाचा राजा आहाज ह्याच्यामुळे परमेश्वराने यहूदाला नमवले. कारण यहूदात स्वैरपणे वागून त्याने परमेश्वराविरुद्ध उल्लंघन केले.
२ इतिहास 28 वाचा
ऐका २ इतिहास 28
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ इतिहास 28:16-19
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ