YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ इतिहास 21:4-17

२ इतिहास 21:4-17 MARVBSI

यहोराम आपल्या बापाच्या गादीवर कायम होऊन बलाढ्य झाला, तेव्हा त्याने आपल्या सर्व भावांना व इस्राएलाच्या काही सरदारांना तलवारीने वधले. यहोराम बत्तीस वर्षांचा असता राज्य करू लागला; त्याने यरुशलेमेत आठ वर्षे राज्य केले. अहाबाच्या घराण्याप्रमाणे, इस्राएलाच्या राजांच्या रीतीप्रमाणे तो चालला; त्याने अहाबाच्या कन्येशी लग्न केले; परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. तथापि जो करार परमेश्वराने दाविदाशी केला होता त्यामुळे आणि त्याने त्याचा व त्याच्या वंशजांचा दीप सर्वकाळ राहील असे वचन दिले होते त्यामुळे तो दाविदाचे घराणे नाहीसे करीना. त्याच्या कारकिर्दीत अदोमाने यहूदाचे स्वामित्व झुगारून देऊन आपला राजा नेमला. तेव्हा यहोराम आपले सेनानायक व आपले सर्व रथ बरोबर घेऊन तिकडे गेला. ज्या अदोमी लोकांनी त्याला घेरले होते त्यांना व रथांच्या नायकांना त्याने रात्रीच्या वेळी उठून मार दिला. अदोमाने यहूदाचे स्वामीत्व झुगारून दिले; ते आजवर तसेच आहे. ह्याच सुमारास लिब्नाने त्याचे स्वामित्व झुगारून दिले; त्याने आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याला सोडले होते म्हणून असे झाले. त्याने आणखी यहूदाच्या पहाडांवर उच्च स्थाने बांधली आणि यरुशलेमेतल्या रहिवाशांना व्यभिचारी मतीने चालायला लावून यहूदास बहकवले. एलीया संदेष्ट्याकडून त्याला एक लेख आला तो असा : “तुझा पूर्वज दावीद ह्याचा देव परमेश्वर म्हणतो, ‘तू आपला बाप यहोशाफाट ह्याच्याप्रमाणे व यहूदाचा राजा आसा ह्याच्याप्रमाणे चालला नाहीस; तर इस्राएलाच्या राजाप्रमाणे चाललास आणि अहाबाच्या घराण्याप्रमाणे यहूदी व यरुशलेमनिवासी ह्यांना व्यभिचारी मतीने चालायला लावले, त्याचप्रमाणे तुझ्याहून चांगले असे जे तुझ्या बापाच्या घराण्यातील तुझे भाऊबंद त्यांचा तू वध केलास; ह्यामुळे पाहा, तुझे लोक, तुझी मुलेबाळे, तुझ्या स्त्रिया व तुझे सर्व धन ह्यांवर परमेश्वर मोठा प्रहार करील; तू आतड्यांच्या रोगाने बहुत पीडा पावशील; तो रोग इतका वाढेल की त्यामुळे दिवसानुदिवस तुझी आतडी गळून पडतील.”’ परमेश्वराने पलिष्टी व कूशी लोकांच्या शेजारचे अरबी लोक ह्यांची मने क्षुब्ध करून त्यांना यहोरामावर उठवले; ते यहूदावर स्वारी करून त्यात घुसले आणि राजमंदिरात जितकी संपत्ती मिळाली तितकी सर्व आणि राजपुत्र व राजस्त्रिया ही अवघी त्यांनी नेली; त्याचा कनिष्ठ पुत्र यहोआहाज1 ह्याच्याखेरीज त्याच्याजवळ कोणी पुत्र राहिला नाही.