यहोशाफाटाने यहूदावर राज्य केले; तो पस्तीस वर्षांचा असताना राज्य करू लागला; त्याने यरुशलेमेत पंचवीस वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव अजूबा, ती शिल्हीची कन्या. त्याची चालचलणूक त्याचा बाप आसा ह्याच्याप्रमाणे होती; ती त्याने सोडली नाही; परमेश्वराच्या दृष्टीने जे बरे ते त्याने केले. तथापि उच्च स्थाने काढून टाकली नव्हती आणि लोकांनी अद्यापि आपल्या वडिलांच्या देवाकडे आपले चित्त लावले नव्हते. यहोशाफाटाची अथपासून इतिपर्यंतची अवशिष्ट कृत्ये हनानीचा पुत्र येहू ह्याची जी बखर इस्राएलाच्या राजांच्या ग्रंथात नमूद केली आहे तिच्यात लिहिलेली आहेत.
२ इतिहास 20 वाचा
ऐका २ इतिहास 20
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ इतिहास 20:31-34
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ