मग देवाच्या आत्म्याने ओदेदाचा पुत्र अजर्या ह्याला स्फूर्ती दिली; तो आसाच्या भेटीस जाऊन त्याला म्हणाला, “हे आसा, अहो यहूदी व बन्यामिनी लोकहो, मी म्हणतो ते ऐका; तुम्ही परमेश्वराच्याबरोबर राहाल तोवर तो तुमच्याबरोबर राहील; तुम्ही त्याला शरण जाल तर तो तुम्हांला पावेल. पण तुम्ही त्याला सोडाल तर तो तुम्हांला सोडील. बहुत काळपर्यंत इस्राएलला खर्या देवाची ओळख नव्हती, त्यांना शिकवायला कोणी याजक किंवा नियमशास्त्र नव्हते; पण ते आपल्या संकटावस्थेत इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याकडे वळून त्याला शरण गेले, तेव्हा तो त्यांना पावला. त्या काळी बाहेर जाणारे व आत येणारे ह्यांपैकी कोणासही शांती नसे; देशाच्या सर्व रहिवाशांना फारच संकटे प्राप्त होत असत. राष्ट्रावर राष्ट्र उलटून व नगरावर नगर उलटून त्या सर्वांचा चुराडा होत असे, कारण देव नाना प्रकारचे कष्ट देऊन त्यांना त्रस्त करीत असे; पण तुम्ही हिंमत धरा, तुमचे हात गळू देऊ नका, कारण तुमच्या कर्तृत्वाचे तुम्हांला फळ मिळेल.”
२ इतिहास 15 वाचा
ऐका २ इतिहास 15
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ इतिहास 15:1-7
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ