अबीया हा आपल्या पितरांजवळ जाऊन निजला. त्यांनी त्याला दावीदपुरात पुरले आणि त्याचा पुत्र आसा हा त्याच्या जागी राजा झाला. त्याच्या कारकिर्दीत देशात दहा वर्षे स्वास्थ्य होते. आसाने आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे चांगले व नीट ते केले; त्याने अन्य देवांच्या वेद्या व उच्च स्थाने काढून टाकली, मूर्तिस्तंभ फोडले व अशेरा मूर्ती भंग केल्या; यहूदी लोकांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्या चरणी लागावे आणि नियमशास्त्र व आज्ञा ह्यांचे पालन करावे अशी त्याने त्यांना आज्ञा केली. त्याने यहूदाच्या सर्व नगरांतून उच्च स्थाने व सूर्याच्या मूर्ती काढून टाकल्या आणि त्याच्या काळात राज्यात स्वस्थता होती.
२ इतिहास 14 वाचा
ऐका २ इतिहास 14
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ इतिहास 14:1-5
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ