शौल येण्यापूर्वी एक दिवस आधी परमेश्वराने शमुवेलास आदेश दिला होता की, “उद्या ह्या सुमारास मी तुझ्याकडे बन्यामिनी प्रांतातला एक मनुष्य पाठवीन, त्याला अभिषेक करून माझ्या इस्राएल लोकांवर अधिपती नेम; तो माझ्या लोकांना पलिष्ट्यांच्या हातून सोडवील; कारण माझ्या लोकांचे गार्हाणे माझ्याकडे आले आहे म्हणून त्यांच्याकडे माझी नजर गेली आहे.” शौल शमुवेलाच्या दृष्टीस पडला तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “ज्या पुरुषाविषयी मी तुला सांगितले होते तो हा; हाच माझ्या लोकांवर सत्ता चालवील.” मग शौल वेशीजवळ शमुवेलाकडे जाऊन म्हणाला, “द्रष्ट्यांचे घर कोठे आहे ते मला सांगा.” शमुवेल शौलाला म्हणाला, “द्रष्टा मीच आहे, माझ्यापुढे उच्च स्थानी चला; आज तुम्ही माझ्याबरोबर भोजन करावे; सकाळी तुझी रवानगी करतेवेळी तुझ्या मनात जे काही आहे त्याविषयी मी तुला सांगेन. तीन दिवसांमागे चुकलेल्या तुझ्या गाढवांसंबंधाने काही चिंता करू नकोस, कारण ती सापडली आहेत. इस्राएलातली सर्व संपत्ती कोणासाठी आहे? तुझ्यासाठी व तुझ्या बापाच्या घराण्यासाठी आहे की नाही?” शौल म्हणाला, “इस्राएल वंशांतले सर्वांहून कनिष्ठ जे बन्यामिनी त्यांतला मी ना? आणि बन्यामिनाच्या वंशातील सगळ्या कुळात माझे घराणे कनिष्ठ ना? तर मग तुम्ही माझ्याशी असले भाषण का करता?” शमुवेलाने शौलाला व त्याच्या गड्याला भोजनगृहात नेले; आणि तेथे सुमारे तीस जण आमंत्रित होते, त्यांच्या पंक्तीतल्या प्रमुखस्थानी त्यांना बसवले. शमुवेलाने आचार्याला सांगितले, “जो वाटा मी तुला राखून ठेवायला सांगितले होते तो घेऊन ये.” आचार्याने मांसाचा फरा व त्याबरोबर जे काही होते ते वर उचलले आणि शौलापुढे ठेवले. तेव्हा शमुवेल म्हणाला, “हे पाहा, हे राखून ठेवलेले आहे, हे आपणासमोर ठेवून खा; कारण मी लोकांना आमंत्रण केले तेव्हापासून ह्या नेमलेल्या वेळेपर्यंत तुझ्यासाठी हे राखून ठेवले आहे.” ह्या प्रकारे शौलाने त्या दिवशी शमुवेलाबरोबर भोजन केले. मग त्या उच्च स्थानावरून उतरून ते नगरात आले; तेव्हा त्याने धाब्यावर जाऊन शौलाशी एकान्तात बोलणे केले. सकाळी ते पहाटेस उठले व सूर्योदयाच्या सुमारास शौल धाब्यावर होता त्याला शमुवेलाने हाक मारून म्हटले, “ऊठ, मी तुझी रवानगी करतो.” शौल उठला आणि तो व शमुवेल असे दोघे बाहेर पडले. गाव संपतो तेथे खाली उतरत असता शमुवेल शौलाला म्हणाला, “आपल्या गड्याला पुढे जाऊ दे (त्याप्रमाणे तो पुढे गेला), तू अंमळ थांब; मी तुला परमेश्वराचा संदेश ऐकवतो.”
१ शमुवेल 9 वाचा
ऐका १ शमुवेल 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ शमुवेल 9:15-27
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ