YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 8:11-18

१ शमुवेल 8:11-18 MARVBSI

तो म्हणाला, “तुमच्यावर जो राजा राज्य करील तो अशी सत्ता चालवील की तो तुमच्या पुत्रांना धरून आपले रथ व घोडे ह्यांची चाकरी करायला ठेवील, आणि ते त्याच्या रथांपुढे धावतील. त्यांतून कित्येक हजाराहजारांवर व पन्नासापन्नासांवर नायक म्हणून तो नेमील; कित्येकांना आपली शेते नांगरायला, कापायला व आपल्या लढाईची व रथाची हत्यारे करण्याच्या कामाला लावील. तो तुमच्या कन्यांना धरून हलवाइणी, स्वयंपाकिणी व भटारणी करील. तो तुमची उत्तम उत्तम शेते, द्राक्षांचे मळे व जैतुनांचे मळे घेऊन आपल्या नोकरांना देईल. तो तुमचे धान्य व द्राक्षांचे मळे ह्यांचा एक दशमांश घेऊन आपले खोजे व चाकर ह्यांना देईल. तो तुमचे दास व दासी, तुमची खिल्लारे1 व गाढवे धरून आपल्या कामावर लावील. तो तुमच्या शेरडामेंढरांचा एक दशमांश घेईल; तुम्ही त्याचे दास व्हाल. त्या दिवशी तुम्ही निवडून घेतलेल्या राजाविषयी गार्‍हाणी कराल, पण परमेश्वर त्या दिवशी तुम्हांला उत्तर देणार नाही.”