YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 7:3-6

१ शमुवेल 7:3-6 MARVBSI

तेव्हा शमुवेलाने अवघ्या इस्राएल घराण्याला सांगितले, “तुम्ही मनःपूर्वक परमेश्वराकडे वळला आहात तर तुमच्यातील अन्य देव व अष्टारोथ ह्यांना दूर करा, आणि परमेश्वराकडे आपले चित्त लावून केवळ त्याचीच उपासना करा, म्हणजे तो तुम्हांला पलिष्ट्यांच्या हातांतून सोडवील.” मग इस्राएल लोक बआलदेव व अष्टारोथ ह्यांना दूर करून केवळ परमेश्वराची उपासना करू लागले. शमुवेल म्हणाला, “सर्व इस्राएल लोकांना मिस्पात जमा करा म्हणजे मी तुमच्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करीन.” तेव्हा ते मिस्पात जमा झाले आणि त्यांनी पाणी काढून आणून परमेश्वरासमोर ओतले व त्या दिवशी उपास करून ते म्हणाले, “आम्ही परमेश्वराचा अपराध केला आहे.” तेव्हा शमुवेल मिस्पात इस्राएलाचा न्यायनिवाडा करत असे.