YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 30:1-8

१ शमुवेल 30:1-8 MARVBSI

दावीद आपल्या माणसांबरोबर सिकलाग येथे तिसर्‍या दिवशी पोहचला तेव्हा त्यांच्या दृष्टीस पडले की अमालेक्यांनी दक्षिण देश व सिकलाग ह्यांवर स्वारी केली असून सिकलागवर मारा करून ते अग्नीने जाळून टाकले आहे, आणि तेथील स्त्रियांना व लहानमोठ्या सगळ्यांना त्यांनी कैद करून नेले आहे; त्यांनी कोणाची कत्तल केली नाही, तरी त्यांचा पाडाव करून ते आपल्या वाटेने गेले. दावीद व त्याचे लोक नगरात आले तेव्हा नगर जाळून टाकले आहे आणि त्यांच्या स्त्रिया, पुत्र व कन्या पाडाव करून नेल्या आहेत असे त्यांना दिसून आले. तेव्हा दावीद व त्याच्याबरोबरचे लोक गळा काढून एवढे रडले की त्यांना आणखी रडण्याची शक्ती राहिली नाही. दाविदाच्या दोन्ही स्त्रिया इज्रेलीण अहीनवाम व नाबालाची स्त्री कर्मेलीण अबीगईल ह्यांना पाडाव करून नेले होते. तेव्हा दावीद मोठ्या पेचात पडला; कारण लोक आपले पुत्र व कन्या ह्यांच्यासाठी शोकाकुल होऊन दाविदाला दगडमार करावा असे म्हणू लागले; पण दावीद आपला देव परमेश्वर ह्याच्यावर भिस्त ठेवून खंबीर राहिला. दावीद अहीमलेखाचा पुत्र अब्याथार याजक ह्याला म्हणाला, “एफोद माझ्याकडे आण. तेव्हा अब्याथाराने एफोद दाविदाकडे आणले. दाविदाने परमेश्वराला प्रश्‍न केला, “मी ह्या टोळीचा पाठलाग करू काय? मी त्यांना गाठीन काय?” त्याने उत्तर दिले, “त्यांचा पाठलाग कर, तू खात्रीने त्यांना गाठशील व सर्वांना सोडवून आणशील.”