दावीद त्या दिवशी निघून शौलाच्या भीतीने पळाला आणि गथाचा राजा आखीश ह्याच्याकडे गेला. आखीशास त्याचे सेवक म्हणाले, “त्या देशाचा राजा दावीद तो हाच ना? ‘शौलाने हजारो वधले, दाविदाने लाखो वधले,’ असे ज्याच्याविषयी बोलून नाचत, गात होते तोच ना हा?” दाविदाने हे बोलणे मनात ठेवले आणि गथाचा राजा आखीश ह्याचा त्याला फार धाक वाटला. तेव्हा त्याने त्यांच्यापुढे आपली चालचर्या बदलून वेड्याचे सोंग केले; तो फाटकाची कवाडे खडखडवू लागला व आपल्या दाढीवर लाळ गाळू लागला. आखीश आपल्या सेवकांना म्हणाला, “पाहा, हा माणूस वेडा आहे हे तुम्हांला दिसते ना? तुम्ही त्याला माझ्याकडे का आणले? माझ्याजवळ वेडी माणसे काय कमी आहेत म्हणून तुम्ही माझ्यासमोर वेडेचार करायला ह्याला आणले आहे? असला मनुष्य माझ्या घरात यावा काय?”
१ शमुवेल 21 वाचा
ऐका १ शमुवेल 21
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ शमुवेल 21:10-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ