एलीचे पुत्र अधम होते; त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती. लोकांसंबंधाने याजकांची वहिवाट अशी होती की कोणी मनुष्य होमबली अर्पण करायला आला तर मांस शिजत असता याजकाचा चाकर हाती त्रिशूळ घेऊन तेथे येई, आणि परातीत, गंगाळात, कढईत अथवा तपेल्यात त्रिशूळ मारून जितके मांस त्याला लागे तितके याजक स्वतःसाठी घेई. शिलो येथे जे इस्राएल लोक येत त्यांच्याशी ते असाच व्यवहार करत. वपेचे हवन करण्यापूर्वीच याजकाचा चाकर येऊन यज्ञ करणार्याला म्हणत असे, “भाजण्यासाठी याजकाला मांस दे, तो तुझ्यापासून शिजलेले मांस घेणार नाही, तर कच्चेच घेईल.” “पहिल्याने वपेचे हवन होईल, मग तुला वाटेल तितके घे,” असे जर यज्ञकर्ता त्याला म्हणाला तर तो म्हणे, “नाही, आता दे, नाहीतर मी जबरीने घेईन.” हे त्या तरुणांचे पाप परमेश्वराच्या दृष्टीने फार घोर होते; कारण त्यामुळे लोकांना परमेश्वरासाठी अर्पण आणण्याचा वीट आला. शमुवेल बाळ सणाचे एफोद धारण करून परमेश्वराची सेवा करत असे. त्याची आई त्याच्यासाठी एक लहानसा झगा तयार करी आणि दर वर्षी आपल्या पतीबरोबर वार्षिक यज्ञ करायला येई त्या वेळी त्याला तो देत असे. एलीने एलकाना व त्याची स्त्री ह्यांना असा आशीर्वाद दिला की, “तुम्ही मागून घेतलेला परमेश्वराच्या स्वाधीन केला त्याबद्दल परमेश्वर तुला ह्या स्त्रीपासून संतती देवो.” मग ती उभयता आपल्या घरी गेली; आणि परमेश्वराने हन्नेवर अनुग्रह केला व ती गर्भवती होऊन तिला तीन पुत्र व दोन कन्या झाल्या. इकडे शमुवेल बाळ परमेश्वरासमोर वाढत गेला. एली फार वृद्ध झाला होता; त्याच्या पुत्रांनी सगळ्या इस्राएल लोकांशी कसकसा व्यवहार केला आणि दर्शनमंडपाच्या दाराशी सेवा करीत असलेल्या स्त्रियांशी त्यांनी कसे कुकर्म केले हे सर्व त्याच्या कानावर आले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुम्ही असली कर्मे का करता? तुमची कुकर्मे ह्या सर्व लोकांकडून माझ्या कानी आली आहेत. माझ्या मुलांनो, असे करू नका; माझ्या कानावर जो बोभाटा येत आहे तो काही ठीक नाही; तुम्ही परमेश्वराच्या प्रजेकडून पातक करवत आहात. कोणा मनुष्याने दुसर्या मनुष्याचा अपराध केला तर न्यायाधीश त्याचा न्याय करील, पण कोणी परमेश्वराविरुद्ध पातक केले तर त्याची वकिली कोण करील?” तरीपण ते आपल्या पित्याचा शब्द ऐकेनात कारण देवाला त्यांना मारून टाकायचे होते. इकडे शमुवेल बाळ हा वाढत गेला; परमेश्वर व मानव त्याच्यावर प्रसन्न होते.
१ शमुवेल 2 वाचा
ऐका १ शमुवेल 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ शमुवेल 2:12-26
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ